पोलीस अधीक्षक यांच्याकडून कारागृहातील गणरायाची आरती

सातारा कारागृहामधील बंदीवानांनाच्या मनातील वाईट विचार, भावना नष्ट व्हावी या हेतूने श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा कारागृहास भेट देऊन कारागृहामध्ये बसवण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती केली.
सातारा : सातारा कारागृहामधील बंदीवानांनाच्या मनातील वाईट विचार, भावना नष्ट व्हावी या हेतूने श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा कारागृहास भेट देऊन कारागृहामध्ये बसवण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती केली.
सर्वत्र सध्या श्रीगणेशाचा धामधूम सुरु आहे. कारागृह प्रशासन देखील सणांचे आयोजन व नियोजन करत असते. कारागृहातील बंदीवानांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कारागृह विभागाचे "सुधारणा पुनर्वसन" या ब्रीदवाक्यनुसार नेहमीच काम करत असते. त्याचाच एक भाग म्हणून कारागृहामधील बंदीवानांनाच्या मनातील वाईट विचार, भावना नष्ट व्हावी या हेतूने श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा कारागृहास भेट देऊन कारागृहामध्ये बसवण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती केली.
तसेच श्रीगणेश ही बुद्धीची देवता आहे. तुम्हा सगळ्यांना सद्बुद्धी देवो आणि सर्वजण गुन्हापासून परावृत्त होवो, अशी शुभेच्छा दिल्या. यावेळी कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सतीश कदम, सुभेदार मानसिंग बागल व इतर अधिकारी, कर्मचारी, बंदीवान हजर होते.