फिट इंडिया मिशन अंतर्गत सातारा पोलिसांची सायकल रॅली

फिटनेस का डोस आधा घंटा रोज या घोषवाक्य अंतर्गत सातारा जिल्हा पोलिसांनी फिट इंडिया उपक्रमांतर्गत दहा किलोमीटरचे सायकलिंग केले. या रॅलीमध्ये अडीचशे पोलिसांचा सहभाग होता.
सातारा : फिटनेस का डोस आधा घंटा रोज या घोषवाक्य अंतर्गत सातारा जिल्हा पोलिसांनी फिट इंडिया उपक्रमांतर्गत दहा किलोमीटरचे सायकलिंग केले. या रॅलीमध्ये अडीचशे पोलिसांचा सहभाग होता, या रॅलीचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले.
दिनांक 24 ऑगस्ट रोजी पोलीस कवायत मैदानातून राहिलेल्या सुरुवात झाली. या रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सकाळी सात वाजता जुना आरटीओ चौक, भूविकास बँक, करंजे नाका, आयटीआय चौक, मोळाचा ओढा, कोंडवे गाव, कोंढवे न्यू इंग्लिश स्कूल शाळा येथून पुन्हा त्याच मार्गाने पोलीस कवायत मैदान येथे ही रॅली समाप्त झाली. यावेळी पोलीस उपाधीक्षक अतुल सबनीस विजय पाटील पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील चिखले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सायकल रायडर क्लब सातारा, सायकल प्रेमी फाउंडेशन ग्रुप कोरेगाव, खाशाबा जाधव पोलीस संघटन केंद्र सातारा, जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी अशा विविध संस्थांचे सुमारे 300 सायकलपटूंनी या रॅली सहभाग नोंदवला. सहभागी झालेल्या पोलिसांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सायक्लोथॉनच्या माध्यमातून नागरिकांनी आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे हा संदेश यावेळी देण्यात आला.