ल्हासुर्णेत घरफोडी; साडेसात तोळे लांबवले

ल्हासुर्णे, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत घरफोडी झाली. या घरफोडीत साडे सात तोळे सोने व रोकड असा तब्बल 1 लाख 93 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल लांबवला.
कोरेगाव : ल्हासुर्णे, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत घरफोडी झाली. या घरफोडीत साडे सात तोळे सोने व रोकड असा तब्बल 1 लाख 93 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल लांबवला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून वैभव प्रताप शिंदे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
घराच्या खिडकीच्या काचा काढून, बार वाकवून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यानंतर 1 लाख रूपये किमतीचा पाच तोळ्याचा कोल्हापूरी साज, 20 हजारांच्या अंगठ्या, 20 हजारांचे सोन्याचे बदाम, सोन्याची नथ, चांदीचे करगुटे, पायातील पट्ट्या,चांदीच्या बिंदल्या व रोख 41 हजार 300 असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे.