गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी घरी बनवा गुलाबी उकडीचे मोदक

गणपती बाप्पाच्या अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर घरी वेगवेगळ्या पदार्थांपासून मोदक बनवले जाते. उकडीचे मोदक, रव्याचे मोदक, गुलकंद मोदक, चॉकलेट मोदक इत्यादी अनेक वेगवेगळे मोदक बनवले जातात.
सातारा : गणपती बाप्पाच्या अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर घरी वेगवेगळ्या पदार्थांपासून मोदक बनवले जाते. उकडीचे मोदक, रव्याचे मोदक, गुलकंद मोदक, चॉकलेट मोदक इत्यादी अनेक वेगवेगळे मोदक बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला गुलाबी उकडीचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. अनेकांना मोदक व्यवस्थित बनवता येत नाहीत. कधी मोदकाची उकड व्यवस्थित होत नाही तर कधी मोदकाच्या काळ्या तुटून जातात. मोदकाच्या आतील सारण व्यवस्थित तयार होण्यासाठी ओल खोबर व्यवस्थित गुळामध्ये मिक्स होणे अतिशय महत्वाचे आहे. पदार्थ बनवताना केलेल्या छोट्या मोठ्या चुका संपूर्ण पदार्थाची चव खराब करून टाकतात. म्हणूनच आज तुम्ही गुलाबी उकडीचे मोदक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत.
साहित्य :
• तांदळाचे पीठ
• गूळ
• ओल खोबर
• खसखस
• वेलची पावडर
• सुका मेवा
• मीठ
• गुलकंद
• गुलाब पाणी
• तूप
कृती :
• गुलाबी उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात मीठ आणि गुलाब पाणी टाकून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा.
• तांदळाच्या पिठावर झाकण मारून एक वाफ काढून गॅस बंद करून घ्या. तयार केलेले पीठ मोठ्या ताटात काढून व्यवस्थित हाताने मळून घ्या.
• कढईमध्ये तूप गरम करून त्यात खसखस आणि सुका मेवा भाजा. नंतर त्यात ओल्या खोबऱ्याचा किस टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
• तयार केलेल्या मिश्रणात गूळ आणि वेलची पावडर, गुलकंद घालून व्यवस्थित मिक्स करा आणि सारण थंड होण्यासाठी काहीवेळा बाजूला ठेवा.
• तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून पारी बनवून घ्या. तयार केलेल्या पारीमध्ये खोबऱ्याचे सारण भरून मोदकाच्या काळ्या पडून ताटात ठेवा.
• तयार केलेले मोदक पाण्यात बुडवून चाळणीमध्ये शिजण्यासाठी ठेवून घ्या. १० ते १५ मिनिटं शिजल्यानंतर मोदक काढून घ्या.
• तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गुलाबी उकडीचे मोदक.