साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
नवी दिल्ली येथे एआय समिट भारत मंडपममध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला.
सातारा : नवी दिल्ली येथे एआय समिट भारत मंडपममध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध सातारा शहर शिवसेना शिंदे गटाच्यावतीने करण्यात आला. खा. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोडो मारो आंदोलन करत फोटोचे दहन केले. आंदोलनकर्त्यांवर देशद्रोही गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी देखील पदाधिकाऱ्यांनी केली.
शिवतीर्थ पोवई नाका येथे खा. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोडो मारो आंदोलन करत फोटोचे दहन करतण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई संपर्कप्रमुख शरद कणसे, रेश्माताई जगताप यांच्या सूचनेनुसार शहरप्रमुख निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर संघटक अमोल इंगोले म्हणाल, नवी दिल्ली येथे एआय समिट भारत मंडपम येथे जगभरातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी पंतप्रधान आपल्या भारताची बाजू मांडत असताना तेथे राहुल गांधी काही समर्थक अर्धनग्न आंदोलन करत आले. ही बाब काँग्रेससाठी सुध्दा निंदनीय असून सदर घटना लज्जास्पद आहे. भारत प्रतिमा बाहेरील प्रतिनिध मलीन होईल असे कृत्य केल्याबद्दल आंदोलनकर्त्यांवर देशद्रोचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी मीनाक्षीताई मोरे, दिपक चव्हाण, किरण कांबळे, उपशहर प्रमुख अजिक्य राजपूत, प्रसन्न शिंदे, उपजिल्हाप्रमुख संगीताताई पवार, तालुका प्रमुख विद्या बर्गे, विमल सुपनेकर, रंजना पवार अजिंक्य राजपूत, राहुल खुडे उपस्थित होते.