धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 337 व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान राजधानी सातारा यांच्या वतीने चौपाटी राजवाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 337 व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान राजधानी सातारा यांच्या वतीने चौपाटी राजवाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या दरम्यान धर्मवीर ज्वालाचे स्वागत, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, मूक पदयात्रा असे कार्यक्रम होणार आहेत.
नियोजन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे की सकाळी 9 वाजता श्रीक्षेत्र वडू बुद्रुक येथून आणलेल्या धर्मवीर द्वारेच्या आगमन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस मान्यवरांच्या हस्ते अभिषेक पूजन व श्लोक पठण करण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता राजवाडा चौपाटी येथे मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त राजवाडा येथून मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे. संभाजी महाराज यांच्या 337 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वसाधारकरांनी धर्म कर्तव्य म्हणून सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.