प्रवासादरम्यान क्लीनर चा खून केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : प्रवासादरम्यान क्लीनर चा खून केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कृष्णात शामराव लेंभे रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव, जि. सातारा यांच्या मालकीच्या गाडी क्र. एमएच 11 डीडी 8850 वर मिथुन सर्जेराव शिंदे रा. गणेशवाडी, ता. सातारा हा चालक म्हणून काम करत होता. तसेच अविनाश सुरेश शिंदे रा. शाळगाव हा क्लिनर म्हणून काम करीत होता. दि. 5 ते 6 सप्टेंबर दरम्यान महापे नवी मुंबई ते पिंपोडे बुद्रुक दरम्यान मिथुन शिंदे याने अविनाश शिंदे याचा मारहाण करून खून केल्या बाबतची फिर्याद वाठार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करीत आहेत.