अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 17 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नवीन एमआयडीसी येथील सुटकेस चौक ते पार्ले कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत प्रणव अनिल जाधव रा. कोडोली सातारा हा अवैधरीत्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून 3520 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस हवालदार राहुल कणसे यांनी केली आहे.