विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई
विनापरवाना मद्यप्राशन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चार जणांवर कारवाई केली आहे.
सातारा : विनापरवाना मद्यप्राशन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चार जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी राजवाडा बस स्टँडच्या पाठीमागील बाजूस मद्य प्राशन केल्याप्रकरणी विजय लाला देटके रा. मंगळवार पेठ सातारा, शब्बीर मौलाली बागवान रा. गडकर आळी सातारा, अभिजीत श्रीकांत पाठक रा. व्यंकटपुरा पेठ सातारा आणि राहुल राजू पवार रा. प्रतापगंज पेठ सातारा यांच्यावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.