कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा
कंपनीच्या सुमारे 20 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : कंपनीच्या सुमारे 20 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऑक्टोबर 2024 पासून सचिन यशवंत शिंदे रा. सदर बझार, सातारा यांच्या प्रिसाइज ग्रुप आणि प्रिसाइज कंट्रोल या एमआयडीसीतील कंपनीत योगेश अशोक भोसले रा. सातारा नोकरी करत असताना त्याने कंपनीची एकूण 20 लाख 51 हजार %90 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.