सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ओंकार राजेंद्र महाडिक रा. शाहूपुरी, सातारा हा दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करीत असताना आढळून आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सावंत करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, ओंकार अंकुश पवार राहणार नानेगाव तालुका पाटण हा राधिका रस्त्यावर दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करीत असताना आढळून आला. पुढील तपास पोलीस हवालदार साळुंखे करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत, राजवाडा ते समर्थ मंदिर रस्त्यावर राजू बादशहा बागवान रा. मंगळवार पेठ, सातारा हे सार्वजनिक रस्त्यावर अश्लील कृती करताना आढळून आले. पुढील तपास सहाय्यक फौजदार कदम करीत आहेत.