मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार
मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सातारा : मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नंदिनी विठ्ठल गायकवाड रा. सदर बझार, सातारा यांनी खिडकीतून आता का थुंकला, असे विचारण्याच्या कारणावरून फिरोज शेख, फिरोज शेख यांचा मुलगा दोन्ही रा. सदर बझार, सातारा यांनी नंदिनी गायकवाड यांच्या पतीला शिवीगाळ, दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. पुढील तपास सपोनि बिले करीत आहेत.