कोरेगावचे पाणीदार आमदार महेश दादा शिंदे हे माझे अत्यंत लाडके आमदार आहेत. या निवडणुकीत महायुतीचे सरकार अवश्य येणार आणि त्यावेळी कोरेगावकरांच्या मनातील असणारी एक इच्छा म्हणजे आमदार महेश शिंदे यांना निश्चित लाल दिवा देणार असे थेट आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त कोरेगावकरांना दिल्यानंतर सभामंडपात एकच जल्लोष झाला.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे यांनी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार गट), रिपब्लिकन पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी महायुतीच्या माध्यमातून सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत, रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रवासादरम्यान क्लीनर चा खून केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.