कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे यांनी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार गट), रिपब्लिकन पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी महायुतीच्या माध्यमातून सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत, रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.
सातारा : कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे यांनी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार गट), रिपब्लिकन पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी महायुतीच्या माध्यमातून सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत, रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.
सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात महायुतीचे कार्यकर्ते एकत्र जमण्यास प्रारंभ झाला. दुपारी साडे अकरा वाजेपर्यंत हजारो लोकांचा जनसमुदाय जमा झाल्यानंतर ना.महेश शिंदे, सुनील खत्री, राहुल बर्गे, राजाभाऊ बर्गे, संदीपभाऊ शिंदे, भास्कर कदम, रमेश उबाळे आदींच्या उपस्थितीत रॅलीला प्रारंभ झाला. अनेकांच्या हातात शिवसेना, भाजपचे झेंडे दिसत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. उदयनराजे भोसले, ना. महेश शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रतिमा असलेले फलकही कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते हलगीच्या तालावर नाचत अनेक कार्यकर्ते भाजप, शिवसेनेचे झेंडे उंचावून घोषणा देत होते. महत्वाच्या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
दुपारी पावणे बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरू झालेली रॅली दुपारी दीड वाजता आझाद चौकात आली. दुपारी पावणे तीन वाजता जुना मोटार स्टँडवर दाखल झाली. दरम्यान ना.महेश शिंदे यांनी उपस्थित जनसमुदयाला मार्गदर्शन केले. यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुभाषनगर येथे नव्याने सुरू झालेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या प्रांत कार्यालयात जाऊन निवडणूक निर्णय तथा उपविभागीय अधिकारी अभिजित नाईक यांच्याकडे ना. महेश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.