कोरेगावचे पाणीदार आमदार महेश दादा शिंदे हे माझे अत्यंत लाडके आमदार आहेत. या निवडणुकीत महायुतीचे सरकार अवश्य येणार आणि त्यावेळी कोरेगावकरांच्या मनातील असणारी एक इच्छा म्हणजे आमदार महेश शिंदे यांना निश्चित लाल दिवा देणार असे थेट आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त कोरेगावकरांना दिल्यानंतर सभामंडपात एकच जल्लोष झाला.
सातारा : कोरेगावचे पाणीदार आमदार महेश दादा शिंदे हे माझे अत्यंत लाडके आमदार आहेत. या निवडणुकीत महायुतीचे सरकार अवश्य येणार आणि त्यावेळी कोरेगावकरांच्या मनातील असणारी एक इच्छा म्हणजे आमदार महेश शिंदे यांना निश्चित लाल दिवा देणार असे थेट आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त कोरेगावकरांना दिल्यानंतर सभामंडपात एकच जल्लोष झाला. डीपी भोसले कॉलेज जवळच्या भंडारी मैदानावर आमदार महेश शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत फुटला यावेळी खासदार उदयनराजे भोसले आमदार महेश शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर उपस्थित होते कोरेगावच्या पाणीदार आमदारांचे कौतुक करण्याची कोणती संधी शिंदे यांनी न सोडता समस्त नागरिकांना महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मते देण्याचे आवाहन केले.
येथील भंडारी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणतीही कसर न करता यांनी भरभरून बॅटिंग केली ते म्हणाले कोविडच्या काळामध्ये स्वतः पदर मोड करून सातारा जिल्ह्यातील अनेक जीव वाचवण्याचे काम आमदार महेश शिंदे यांनी केले. कोरेगाव तालुक्याला सिंचनाखाली आणण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र मेहनत केली आबदरवाडी तलावाचे काम अंतिम टप्प्यांमध्ये आहे तसेच जिहे कठापूर या योजनांसाठी सादर केलेला अंतिम आराखडा त्याला मिळालेल्या प्रशासकीय मान्यता याचे सारे श्रेय आमदार महेश शिंदे यांना आहे. त्यामुळे त्यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष केले आहे पण यापुढे विधानसभा निवडणूक नंतर महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांना याहीपेक्षा मोठी जबाबदारी दिली जाईल असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या जबाबदारीचे सूतोवाच केले. ते म्हणाले आमदार महेश शिंदे हा माझा लाडका आमदार आहे सातार्याची भूमी ही छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे येथील जनतेला खोटं चालत नाही विरोधकांनी उज्वला गॅस, लाडकी बहीण योजना, युवक स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम या सर्व योजनांच्या विरोधाचे वातावरण तयार करून चुनावी जुमलेबाजी अशी उपाधी दिली होती मात्र या सर्वांना महायुतीच्या शासनाने तोडीस तोड उत्तर दिले आहे लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही खरोखर सर्व पैशाची तरतूद करून ती योजना जाहीर केली होती लाडक्या बहिणींना या पुढील काळातही याहीपेक्षा जास्त ओवाळणी आम्ही देणार आहोत त्यासाठी महायुतीचे सरकार हे महाराष्ट्राच्या विकासासाठी येणे आवश्यक आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना तुम्ही भरभरून मते द्या असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले
खासदार उदयनराजे भोसले यांनी संपूर्ण ताकद आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी उभी केली आहे महायुतीच्या सर्व आमदारांना निवडून आणणार असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरेगावकरांची मने जिंकली ते म्हणाले आमदार महेश शिंदे यांच्या कामाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे कोरेगाव तालुक्यामध्ये 600 कोटीची जी विकास कामे उभी राहिली आहेत त्याचे सर्वश्रेय आमदारांनाच आहेत विरोधकांनी केवळ पाच वर्षे विरोधाचे राजकारण केले पण विकास काय असतो हे आमदार महेश शिंदे यांनी दाखवून दिले आहे कोरेगाव मधून 20 नोव्हेंबर नंतर गुलाल कोणाच्या अंगावर पडणार हे सांगायला कोणाचीही गरज नाही आमदार महेश शिंदे यांचा हात उंचावून उदयनराजे यांनी विजयाची खून करताच संपूर्ण सभामंडप प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणला
या सभेत कोरेगावकरांना संबोधित करताना आमदार महेश शिंदे म्हणाले गेल्या पाच वर्षात आपण सर्वांचे मिळालेले प्रेम आणि तालुक्याच्या विकासासाठी झालेले योगदान हा माझ्यासाठी अत्यंत समाधानाचा भाग आहे मात्र यापुढेही जाऊन जास्तीत जास्त पायाभूत सुविधा आणून कोरेगाव तालुक्यातील सामान्य जनतेला न्याय देण्याचा मला शेवटपर्यंत प्रयत्न राहील यापुढेही जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने विकासाची गंधा ही अशीच कोरेगाव तालुक्यामध्ये वाहती राहणार आहे. यापुढे कोरेगाव तालुका हा दुष्काळी म्हणून त्यांना जाणार नाही तर सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर जिहे कठापूर योजनेअंतर्गत येणारे पाणी हे कोरेगाव तालुक्यातील बहुतांश भागाला पाण्याने समृद्ध करणार आहे कोरेगाव तालुक्यातील बळीराजाला न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून झाला याचेही मला समाधान आहे आपण सर्वांनी असाच माझ्यावर विश्वास ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.