शिवडीमधून शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. निष्ठेवर उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करत शिवडी, परळ, लालबागचा विकास करणार असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी पक्षाचे दोन स्वतंत्र गट झाल्यानंतर फलटण व वाई या दोन विधानसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट प्रथमच आमने- सामने येत आहेत. सातारा जिल्हा शरद पवारांना मानतो, तर अजित पवार यांचा सुद्धा कार्यकर्ता वर्ग येथे मोठा आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघातून कोणत्या पवारांच्या विचारांना सातारा जिल्हा साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सविस्तर वृत्तकोरेगाव तालुक्यात विनापरवाना सोयाबीनचा व्यापार करुन शेतकर्यांची अडवणूक करणार्या आणि त्यांच्यावर अन्याय करणार्या व्यापार्यांवर कृषी उत्पन्न बाजार समितीने धडक कारवाई सुरु केली आहे. शेतकर्यांच्या तक्रारीवरुन कुमठे येथे व्यापार्यावर बुधवारी दुपारी 12 वाजता बाजार समितीच्या भरारी पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून 33 हजार 371 रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला.
सविस्तर वृत्तहिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला वेगळेपण आहे. त्यातून रुढी, प्रथा, परंपरा पाळण्याबरोबरच अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्वही त्यात दडलेले आहे. सुख-समृद्धीचे प्रतीक म्हणून दिवाळीत नरक चतुर्दशीला विशेष महत्व आहे. गुरुवारी (दि. 31) नरक चतुर्दशी आहे त्यानिमित्त लक्ष्मी, कृष्ण, माता काली, यमराज आणि हनुमान या देवतांचे नरक चतुर्दशीच्यादिवशी पूजन केले जाते.
सविस्तर वृत्तशुभेच्छुक : मा. नितीन पाटील, अध्यक्ष मा. अनिल देसाई, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ.
सविस्तर वृत्तया महिन्याच्या सुरुवातीला अदानी समूहाने नवी मुंबईच्या धावपट्टीवर भारतीय हवाई दलाच्या विमानांचे यशस्वीरित्या लँडिंग केले होते. सिंग यांनी अदानी फ्लॅगशिप कंपनीच्या तिमाही आणि सहामाही निकालांची घोषणा करताना सांगितले की, ते पुढील वर्षी, 2025 च्या पहिल्या सहामाहीत विमानतळाचे ऑपरेशन सुरू करण्याच्या मार्गावर आहेत.
सविस्तर वृत्तदिवाळी व इतर सणाचे वेळी मोठया आवाजाचे फटाके उडविण्यामुळे निर्माण होणा-या ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालणेबाबत आदेश दिलेले आहेत. तसेच पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 अंतर्गत पर्यावरण (संरक्षण) नियम व सुधारीत नियम 89 जे फटाक्याच्या आवाजाच्या मानांकनाबाबत आहेत त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसांत सुमारे 213 ट्रॅव्हल्सची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये 71 ट्रॅव्हल्सने नियमभंग केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना 1 लाख 59 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२९) अर्ज भरणाच्या शेवटच्या दिवशी महायुती तसेच महाविकास आघाडीतील बंडखोरांनी अपक्ष नामनिर्देशनपत्र सादर केले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांपुढे पेच निर्माण झाला असून, प्रमुख उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हयाची अर्थवाहिनी, सर्वसामान्यांची बँक असा नावलौकीक असलेल्या जनता सहकारी बँक लि.,सातारा,चे भागधारक पॅनेलप्रमुख बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन, जेष्ठ संचालक विनोद कुलकर्णी यांची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांनी बँकेच्यावतीने पेढे, शाल व पुष्पगुच्छ देवून यथोचीत सत्कार केला.
सविस्तर वृत्त