सातार्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात 50 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. या कामास लवकरच प्रारंभ होणार असून, प्रकल्पामुळे संग्रहालयाच्या वीजबिलात मासिक सुमारे एक लाख रुपयांची बचतही होणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा- जावलीतील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला, आमदारकीची संधी दिली. मतदारसंघाचा चौफेर विकास करून जनतेने दिलेल्या संधीचे मी सोनं केले आहे. सातारा आणि जावलीतील जनतेशी कधीही न तुटणारी नाळ जोडली गेली आहे. जनतेच्या कायम ऋणात राहून मतदारसंघाचा विकास करणे हेच माझे कर्तव्य आहे.
सविस्तर वृत्त20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
सविस्तर वृत्तकोल्हापुरात खासगी बसला आग लागल्यानं एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. बेळगाहून पुण्याला जात असताना बसने पेट घेतला. यात एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची माहिती समजते. बेळगावहून पुण्याला निघालेली खासगी ट्रॅव्हल्सची बस जळून खाक झाली. यामध्ये एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तशिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वडील स्व. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराजांनी त्यांच्या उमेदीच्या काळात असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सातारा तालुक्यात सहकारक्रांती घडवली. आज अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व अजिंक्य उद्योग समूहातील विविध संस्थांच्या माध्यमातून स्व. भाऊसाहेब महाराजांचा गट सातारा तालुक्यात आजही शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत सक्षमपणे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहे.
सविस्तर वृत्तपाटण तालुक्यातील सडा दाढोली येथील वयोवद्ध पुरुष व महिलांचा पाटण तालुका प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. विधानसभा निवडणूकीत शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहनही करण्यात आले.
सविस्तर वृत्तभारताची लोकशाही जगात प्रसिद्ध आहे. लोकशाही जास्तीत जास्त प्रगल्भ होण्यासाठी आई-बाबांना प्लीज तुम्ही मतदान करा, असे आव्हान चिमुकल्यांनी स्वतः पत्र लिहून केले.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. तेव्हापासून राज्याचे राजकारण रंगले असून विविध घडामोडी घडत आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबरपासून उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. काल (दि.24) गुरुपुष्यामृत योग साधून अनेक बड्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सविस्तर वृत्तखरीप हंगाम सन २०२४-२०२५ मध्ये आधारभुत दरानुसार नाफेडमार्फत आधारभुत किंमत योजनेंतर्गत सोयाबीन खरेदी करणेकरीता खरीप हंगाम २०२४ मध्ये उत्पादीत सोयाबीन आधारभुत किंमत खरेदी योजनेअतंर्गत शेतक-यांकडुन ऑनलाईन नोंदणी करुन विक्री करणे करीता कोरेगांव तालुका खरेदी विक्री संघ लि. कोरेगांव मार्केट यार्ड कोरेगांव ता. कोरेगांव जि. सातारा (संपर्क-९९२२३९४८३३) या संघाकडे खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.
सविस्तर वृत्तबारामतीमध्ये युगेंद्र पवार यांची लढाई स्वतःचे डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल, तर अजितदादा यांची लढाई 2019 च्या मताधिक्याचा विक्रम मोडण्यासाठी असेल. असे म्हणत, राषट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शरद पवारगटाला डिवचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त