दिवाळी सुरू झाली आहे. फटाके हा दिवाळीतला जणू अनन्यसाधारण भाग बनला आहे. पण दुसरीकडे बदलत्या काळाबरोबर प्रदूषणात वाढ होत आहे. त्यात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची भर पडत असल्याने त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.
सविस्तर वृत्तमुंबईत शुक्रवारपासून विविध ठिकाणी आगी लागण्याच्या घटना सुरूच आहेत. शुक्रवारी अंधेरी, सायन येथे आगीच्या घटना घडलेल्या असतांना दुसऱ्या दिवशी अर्थात आज (शनिवार) दुपारच्या सुमारास गोरेगाव (पश्चिम) कल्पतरू रेसिडेन्सी या ३२ मजली इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्तआळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर बरड (ता. फलटण) येथील बागेवाडी पेट्रोल पंपाजवळ कंटेनरच्या धडकेत कारमधील तीन जण ठार झाले. सागर रामचंद्र चौरे (वय ३४, रा. पाडेगाव, ता. खंडाळा), भाऊसाहेब आप्पा जमदाडे (वय ४५, रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा), नीलेश चंद्रकांत शिर्के (वय ४०, रा. वेटणे, ता. खटाव. मूळ रा. खटाव, ता. खटाव) अशी मृतांची नावे आहेत. काल पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.
सविस्तर वृत्तमहेश शिंदे यांच्या प्रचारार्थ खेड येथून युवक तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भव्य बाईक रॅली काढली.
सविस्तर वृत्तमहाविकास आघाडीचे सातारा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमितदादा कदम यांनी प्रचाराचा शुभारंभ केला असून सातार्यात त्यांचे प्रचार दौरे गतिमान झाले आहेत. बुधवारी सातारा पालिकेचे माजी नगरसेवक व सभापती वसंत लेवे यांच्या वाढदिवसानिमित्त अमितदादा कदम यांनी उपस्थिती दर्शवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या उपस्थितीची राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.
सविस्तर वृत्ततिरुपती भिशीमध्ये गुंतवलेले 50 हजार रुपये वेळोवेळी मागूनही ते न दिल्याने महिलेविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तसंशयास्पद वस्तू जवळ बाळगून फिरणार्या पाचजणांवर संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा एसटी स्टॅन्ड परिसरातून अज्ञात चोरट्याने मंगळसूत्राची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तहोऊ घातलेली विधानसभा निवडणूक विचारांवर आधारित असल्याने कराड उत्तर च्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन स्व. यशंतरावजी चव्हाण साहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सहकार्य करा असे प्रतिपादन बाळासाहेब पाटील यांनी केले.
सविस्तर वृत्तसातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, मेढा येथील कुंभारवाड्यात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व धर्मातील विविध समाजातील लोकांसोबत अनोखी दिवाळी साजरी करून फराळाचा आनंद घेतला.
सविस्तर वृत्त