महायुतीचे सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातार्यात सोमवारी विराट शक्ती प्रदर्शन करत दुपारी दोन वाजता आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खासदार उदयराजे भोसले तसेच बाबाराजे समर्थकांसह निवडक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आरंभ ही प्रचंड है, बाबाराजे तुम आगे बढो अशा घोषणाबाजींनी राजवाडा परिसर दणाणला.
सविस्तर वृत्तलष्कारातील उत्पादने ‘मेड इन इंडिया’ करण्याचे धोरण मोदी सरकारने आखले आहे. यामुळे भारतीय लष्कारातील उत्पादने खासगी कंपन्याही आता विकसित करु लागल्या आहेत. देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख असलेल्या टाटा समूह हवाईदलासाठी विमाने बनवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज सोमवारी टाटा एअरक्रॉप्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करत आहेत.
सविस्तर वृत्तदरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर 'रन फॉर हेल्थ व रन फॉर ऑल" हे ब्रीदवाक्य घेवून आयोजित होत असलेली निमा रन 2024 ची तिसरी आवृत्ती साताऱ्यात पार पडली. यामधे साताऱ्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून 1100 धावपटू 10 व 3 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभागी झाले होते.
सविस्तर वृत्तदीपोत्सवाचा सर्वत्र माहोल तयार झाला असून, अवधं जनजीवन उत्साहाने न्हाऊन गेले आहे. खरेदीसाठी नागरिकांची गदीं होत असून, बाजारपेठा तुटुंब झाल्या आहेत.
सविस्तर वृत्तभारतीय उद्योग विश्वातील लिजेंड असणारे रतन टाटा यांचे मुंबईत 9 ऑक्टोंबर रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचे मृत्यूपत्र समोर आले. त्यात त्यांनी घरातील कर्मचाऱ्यापासून आपल्या आवडत्या श्वानासाठी तरतूद करुन ठेवली होती. भारतातील अनेक क्षेत्रात टाटा समूहाचे सामाजिक कार्य सुरु असते. त्यामुळेच टाटा हे नाव भारतीयांच्या मनमानात बसले आहे. आता रतन टाटा यांचा सन्मान ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने करण्याचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वृत्तसातारा-जावली विधानसभेत मतदारसंघाचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा बहुप्रतिक्षित उमेदवाराचा तिढा अखेर सुटला आहे. महाविकास आघाडीच्या रस्सीखेचीमध्ये सातारा- जावली विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेला असून तेथून अमितदादा कदम यांनी शिवबंधन स्वीकारलेे आहे.
सविस्तर वृत्तचेहर्यावरचे कावरेबावरे हावभाव, काहींच्या हातामध्ये लहान बाळ, शाळेच्या प्रवेशद्वारावर छोट्या विद्यार्थीनींनी केसात माळायला दिलेले गजरा व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून केलेले स्वागत यामुळे भारावून गेलेल्या सातारा शहरातील विविध भागातील कचरा वेचक महिला भारावून गेल्या. निमित्त होते सातारा शाहुनगर येथील गुरूकुल स्कूलमधील दीपावलीचे.
सविस्तर वृत्तकराड तासवडे टोल नाक्यावर १५ लाखाची रोकड वाहनातून नेली जात असताना तळबीड पोलिसांनी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मोठ्या रकमा वाहनातून नेल्या जात असल्याने पोलीस दल अलर्ट असून जिल्ह्यात विविध ठिकाणी चेक पोस्टवर कसून तपासणी केली जात आहे.
सविस्तर वृत्तआगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून विविध गावांमध्ये रूट मार्च काढण्यात आला.
सविस्तर वृत्तकेरळ पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली आयोजित ग्लोबल लाइव्हस्टॉक कॉन्क्लेव्हने दुग्धव्यवसाय, पशुधन, आणि कृषि क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी एक नवा अध्याय सुरू केला आहे. कोची येथे झालेल्या या विशेष कार्यक्रमात केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज (KUFOS) चे कुलगुरू डॉ. प्रदीप कुमार यांच्या हस्ते विद्यापीठाची वेबसाइट लाँच करण्यात आली.
सविस्तर वृत्त