विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात आजपासून मतदार संघाच्या हद्दीसह अनेक ठिकाणी स्थिरपथके तैनात करण्यात आली आहेत.
सविस्तर वृत्तकाँग्रेस आणि उद्धवसेनेतील वाद शमल्यानंतर मंगळवारी सुरू झालेल्या महाविकास आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ रात्री उशीरापर्यंत सुरू होते. रात्री उशीरा ठरल्यानुसार काँग्रेस आणि उद्धवसेनेतील जागा वाटपावर मार्ग काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस सर्वाधिक १०५ च्या घरात जागा लढणार आहे, त्याखालोखाल उद्धवसेना ९५ च्या घरात आणि शरद पवार गट ८४ च्या घरात जागा लढवणार असून उरलेल्या जागा लहान मित्र पक्षांना सोडण्यात आल्याचे मविआतील सूत्रांनी सांगितले.
सविस्तर वृत्तकेंद्रीय निवडणूक आयोगाने महराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत.
सविस्तर वृत्तराज्यामध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. अवघ्या एका महिन्यामध्ये मतदान होणार असून राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु असून प्रचाराचा धडाका उडाला आहे. राज्यामध्ये बंडखोरीचं राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे सर्व पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा गुवाहाटी वारी केली आहे.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणणुकीचे बिगुल वाजले आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजप, शिंदे गट आणि त्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने देखील उमेदवार जाहीर केले आहेत. अजित पवार यांच्या पक्षाने पहिली यादी जाहीर करत 38 उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सर्वांत जास्त लक्ष हे बारामती मतदारसंघाकडे लागले होते. अखेर याबाबत निर्णय जाहीर झाला आहे.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुक २0२४ साठी मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली आाहे. पहिल्याच दिवशी ६ नामनिर्देश अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये फलटण मतदारसंघासाठी दोन, कोरेगावसाठी दोन, कराड उत्तर १, सातारा मतदारसंघासाठी १ अशी एकूण ६ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाईचा डबलबार करत लाच घेणार्यांचा पर्दाफाश केला. भूमी अभिलेख खंडाळ्याच्या उपअधीक्षक उर्मिला गलांडे व स्विटी उमाप या कंत्राटी कर्मचारी महिलांना ७५ हजार रुपये घेताना तर गाेंदवले येथील महावितरणचा लाईन हेल्पर विशाल जाधव याला ६०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
सविस्तर वृत्तमाण तालुक्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह गावालगतच्या तलावात उडी मारुन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती समजताच पती स्वप्नील बापू चव्हाण यानेही विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
सविस्तर वृत्तसीआरपीएफच्या (CRPF) दिल्लीसह देशभरातील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्व सीआरपीएफ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे. सोमवारी रात्री देशातील अनेक शाळांना हा मेल आला होता.
सविस्तर वृत्तनागठाणे, ता. सातारा येथील पुणे-बेंगलोर महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम दोन महिन्यांपासून बंद आहे. ठेकेदार कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे हे काम ठप्प झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. काम ठप्प झाल्याने नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. केवळ पुलाचे काम न झाल्याने 60 गावांमधील लोकांचा जीव टांगणीला लागला आहे.
सविस्तर वृत्त