राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. तर प्रशासकीय कामांना वेग आला आहे. निवडणुका जाहीर होताच आता पोलिसांचीही कामे वाढणार आहेत. मुंबईसह राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टीसह रजा बंद केल्या आहेत.
सविस्तर वृत्तसाताऱ्याच्या श्लोक विक्रम घोरपडे याने केटीएम फॅक्टरी रेसिंग इंडियाच्या टीमला मोठा विजय मिळवून दिला आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी मसापचे कोषाध्यक्ष विनोद सुर्यनारायण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत मराठी भाषा विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मंगळवार आचारसंहिता लागू झाली. जिल्ह्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्या संदर्भाने सातारा जिल्ह्यात 3165 मतदान केंद्रे असून जिल्ह्यातील 24 लाख 28 हजार 871 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये सातारा जिल्ह्यातील दोन शाळेचा गौरव झाला आहे. शासकीय शाळांच्या गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे मिलिटरी (ता. सातारा) या शाळेचा कोल्हापूर विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ज्ञानसंवर्धिनी विद्यालय शिरवळ (ता. खंडाळा) या शाळेला कोल्हापूर विभागांमध्ये तृतीय क्रमांक मिळाला.
सविस्तर वृत्तराष्ट्रीय पोषण माह उपक्रमात महाराष्ट्राने देशात पहिला नंबर पटकावला आहे. महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांनी या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या सातव्या राष्ट्रीय पोषण महा सांगता समारंभ झाला. या उपक्रमात राज्यात तृतीय क्रमांकावर कामगिरी केलेल्या सातारा जिल्हा परिषदेचाही सत्कार करण्यात आला.
सविस्तर वृत्तज्यांच्याकडे सांगण्यासाठी काही नसते, त्यांना काही ना काही कृप्त्या लढवाव्या लागतात. मी माझ्या मतदारसंघात एवढे काम केले आहे की मला विरोधकांबाबत बोलण्यासाठी वेळ नाही. लोकांच्या हिताचे आणि विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळेच मतदारसंघातील माझ्या बहिणी, नागरिक माझ्यावर प्रेम करीत आहेत. तसेच रामराजे कधीच कोणाचे नाहीत. शरद पवारांनी त्यांना नाव दिले, त्यांना त्यांनी सोडले.
सविस्तर वृत्तरोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प ट्रस्ट संचलित आनंदबन मतिमंद मुलांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामधील १८ वर्षांच्या पुढील प्रौढ विशेष मुलांनी बनवलेल्या "रोटरी दिवाळी कीट" चे उद्घाटन श्रेणीकभाई शाह- व्यवस्थापक- म्हसवडकर सराफ- सातारा यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. या कीटला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सविस्तर वृत्ततुम्ही काही चिंता करू नका. काही झालं तरी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात महाराष्ट्रात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फलटण येथे सांगितले.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेच्या बांधकाम विभागाचे ‘क’ श्रेणीतील अभियंता सुधीर चव्हाण व अनंत प्रभुणे यांची बदली करण्यात आली आहे. चव्हाण यांची बदली कराड नगरपालिकेत तर, प्रभुणे यांची बदली वाई नगरपालिकेत करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त