जीवन मरणाशी सततचा संघर्ष करणार्या थॅलेसेमिया रुग्णांना वेळेत औषध पुरवठा करण्याबाबत शासन पातळीवर उदासीनता आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात यावरची औषधे उपलब्ध नसल्याने सातार्यासह विविध जिल्ह्यांतील नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. या रुग्णांची बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठीची परवड थांबवण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सविस्तर वृत्तकाँग्रेस पक्ष कार्यालयात निरीक्षक आमदार कुणाल पाटील यांची भेट घेऊन आमदार हिरामण खोसकर यांनी आपली मुलाखत दिली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा खोसकर यांच्यावर पक्षाचाच आक्षेप असून तेव्हापासून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत डळमळीत अवस्था असल्याचे पक्षातून बोलले जात होते.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुणे शहरात जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) या पक्षाला चार जागा मिळण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्तमासिक वीजबिल शून्यवत करण्यासाठी सुरु असलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल ४१ हजार ११५ घरगुती ग्राहकांनी सहभाग घेतला असून त्यांचे मासिक वीजबिल शून्य होणार आहे. सद्यस्थितीत ९ हजार ८०८ घरगुती ग्राहकांकडे छतावरील ३९.२ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने त्यांचे वीजबिल देखील शून्यवत झाले आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय कायमची दूर व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. आंगामी काळात शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करून शहरातील रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे
सविस्तर वृत्तआमच्या महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरु करुन माता - भगिनींच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार देण्याचा निर्णय अंमलात आणला. पण त्यामुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागले आहे. फुकटचे खायची सवय लावू नका, असे सुप्रिया सुळेही सांगू लागल्या आहेत. तसे पहायला गेले तर फुकटचे खायची सवय पवारानांच आहे.
सविस्तर वृत्तरचनात्मक समाज हा मानवी कल्याणासाठी नेहमीच प्रेरक असतो. या रचनात्मक समाजासाठी त्यांना मार्गदर्शन करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक ठरतात. भाजपच्या गटनेत्या व आचार्य सिद्धी पवार हे असेच व्यक्तिमत्त्व आहे. विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणार्या सिद्धी ताई यांनी अल्पावधीत केलेले कार्य प्रेरणादायी आहे, असे उद्गार अभिनेते स्वप्निल जोशी यांनी काढले.
सविस्तर वृत्तवाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघात माझ्याच घरात सर्व सत्ता घेवून विद्यमान आमदारांनी लोकशाहीची थट्टा चालवली आहे. मीच आमदार, माझाच भाऊ खासदार, जिल्हा बँकेचा चेअरमन देखील आमच्याकडेच..,मीच दोन्ही साखर कारखान्याचा चेअरमन, आम्हीच बाजार समितीचे संचालक, आम्हीच सरपंच... अशा ‘मी’ पणाच्या नादात विद्यमान आमदारांनी सत्तेचे केंद्रीकरण करून मतदार संघात दहशत माजवली आहे,
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यामध्ये खाजगी फायनान्स कंपनीचा कारभार बेफाम झाला असून यावर कोणताही शासकीय प्रतिबंध नाही. हा मनमानी कारभार तातडीने थांबवावा अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे. याचे निवेदन त्यांनी शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना सादर केले.
सविस्तर वृत्तलाडकी बहीण योजनेसाठी महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये कमालीचा श्रेयवाद सुरू आहे. राज्याची वित्तीय तूट दोन लाख तीस हजार कोटी इतकी प्रचंड आहे, तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष करून राज्य शासन धडाधड वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहे. राज्यात महिला अत्याचार वाढलेले असताना लाडक्या बहिणींच्या योजनेचे कौतुक केले जात आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, अशी घनाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.
सविस्तर वृत्त