मारहाण तसेच विनयभंगप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तजावळी, महाबळेश्वर, सातारा आणि पाटण या चार तालुक्यांतील २३५ गावांचा समावेश असलेली नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला. पर्यटन वाढीसह समाविष्ट गावांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक पर्याय यात समाविष्ट केले आहेत. प्रकल्पाचे विशेष प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांची नियुक्ती असून, त्यांच्या वतीने हा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वरवाडी (ता. माण) येथे चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याच्या शरीरावर खोल जखमा होत्या. शिवतेज सचिन गाढवे (वय चार) असे त्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्तयेथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्री उत्सवातील ललिता पंचमी निमित्त मान्यवर कुमारिका तसेच सुवासिनी यांचे पूजन थाटात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मंदिरात आलेल्या या सर्व कुमारिका व महिलांना हळद, कुंकू लावून त्यांची पोटी भरण्यात आली. तसेच फळे आणि प्रसाद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
सविस्तर वृत्तशिवसागर जलाशयावर मुनावळे ता. जावली येथे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नातून जागतिक दर्जाचे केंद्र सुरु करण्यात आले आहे. दरम्यान हे जलपर्यटन केंद्र विकसित करून येथे उच्चतम दर्जाचे वॉटर स्पोर्ट्स सुरु झाले पाहिजे त्यासाठी वाढीव निधी मिळावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता.
सविस्तर वृत्तराज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार एप्रिल २०२४ पासून राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्यात येत आहे. या योजनेचा पुणे प्रादेशिक विभागामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयातील १२ लाख १८ हजार ९९९ कृषिपंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांच्या एप्रिल ते जून २०२४ च्या त्रैमासिक वीजबिलांपोटी राज्य शासनाकडून ७५० कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त महावितरणला प्राप्त झाली आहे.
सविस्तर वृत्तऐतिहासिक शाहू नगरीने शनिवारी विजयादशमीचा अर्थात दसर्याचा शाही बाज अनुभवला. हत्ती, घोडे, उंट, पारंपारिक वेशातील मावळे अशा शिवकालीन स्वरूपात सातार्यातून दसर्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सविस्तर वृत्तनागरिकांचे गहाळ झालेले सुमारे आठ लाखांचे मोबाईल हस्तगत करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर वृत्तनवरात्र उत्सवानिमित्त वीरांगना प्रतिष्ठान च्या वतीने होम मिनिस्टरचा कार्यक्रम बसवेश्वर भवन या हॉल वर संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत खेळात सहभाग घेतला. भरघोष बक्षिसे जिंकून पैठणी व लेडीज सायकल मिळाल्याने महिलांचा आनंद द्विगुणीत झाला.
सविस्तर वृत्तअनेक अडथळ्यांवर मात करुन आणि पाणीदार आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याने टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती मिळाली आहे. या योजनेसाठी एकूण आठ टीएमसी पाणी आणि 7 हजार 370 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या योजनेचा माण आणि खटावला सर्वाधिक लाभ होणार आहे. सुजलाम, सुफलाम माण - खटाव स्वप्नपूर्तीच्या दिशेने निघाला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह व्हिडिओद्वारे केले.
सविस्तर वृत्त