किल्ले सज्जनगड-ठोसेघर मार्गावर बोरणे घाटात कचर्यांचे ढिगारे दिसून येत आहेत. कोणी अज्ञाताने हा कचर्याचा ढीग टाकल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या कचर्यामुळे परिसरातील वन्य जीवांना धोका असून पर्यटकांसह निसर्ग प्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
सविस्तर वृत्तभारताच्या उद्योग क्षेत्रातील कोहिनूर, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा 86 वर्षांचे होते.
सविस्तर वृत्तदुचाकीला कुत्रे आडवे आल्याने दुचाकी घसरून राजू तानाजी कोरे (वय 43, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रहिमतपूर हद्दीतील चौकीचा आंबा येथे दि. 8 रोजी सायंकाळी सहा वाजता झाला. या अपघातात राजू कोरे यांची पत्नीसुद्धा गंभीर जखमी झाली आहे.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. सध्या दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जात आहे.
सविस्तर वृत्तयुवकांचे राष्ट्र म्हणून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. त्यामुळे देशाच्या लोकशाहीला युवकच बलशाली करू शकतात. आत्मनिर्भर आणि वैभवशाली राष्ट्रासाठी युवकांनी 100 टक्के मतदान करावे, असे आवाहन माजी खासदार पूनम महाजन यांनी केले.
सविस्तर वृत्तभारतीय जनता पार्टीच्या सातार्यातील कार्यकर्ते-पदाधिकार्यांनी आज सातार्यात जल्लोष करून पेढे वाटून आनंद साजरा केला.
सविस्तर वृत्तवाई शहरात शिवसेनेच्या संवाद यात्रेचा जोरदार झंजावात पहायला मिळाला हजारो महिला पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी सिद्ध झाल्या असून शासनाने दिलेल्या अनेक योजनेमुळे महिला आनंदी आहेत.
सविस्तर वृत्तफलटण शहरासह तालुक्यामध्ये जनावरांची वाहतूक करणाऱ्या कुरेशी टोळीला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हे आदेश दिले. तौफिक इम्तियाज कुरेशी वय 23, ईलाही हुसेन कुरेशी वय 25, अरबाज इम्तियाज कुरेशी वय28, ईनायत हुसेन कुरेशी वय 27 सर्व राहणार कुरेशी नगर, मंगळवार पेठ, फलटण या चौघांना हद्दपार प्राधिकरणाने तडीपार केले आहे.
सविस्तर वृत्तशिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट व जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आयोजित राजधानी रास दांडियाचे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यासिनी नागराजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रास दांडियाच्या पहिल्या दिवशी परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सविस्तर वृत्तवंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 9 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून घेतल्या जाणार आहेत, याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे. राज्य निवडणूक समन्वय समितीचे राज्य सदस्य प्राध्यापक सोमनाथ साळुंखे या मुलाखती घेणार आहेत.
सविस्तर वृत्त