लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि तिथेही हे सावत्र भाऊ ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले. तिथून ते मुंबई हायकोर्टात गेले होते. आता नागपूरच्या कोर्टात गेले आहेत. काँग्रेसचे सुनील केदार यांनीच लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई कोर्टात याचिका दाखल केली, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.
सविस्तर वृत्तगुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजने(जिहे कटापूर योजना) करीता सन 2022-23 च्या दरसुचीनुसार रुपये 5409.72 कोटी रुपयांच्या तिस-यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत देण्यात आली. या निर्णयामुळे खटाव, माण, कोरेगांव आणि सातारा तालुक्यातील एकूण 176 गावांमधील 60,437 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. या तीसऱ्या सुधारित प्रशासकीय मंजूरीमुळे कायम दुष्काळी भाग म्हणून माण,खटाव तालुक्याला लागलेला कलंक निश्चितपणे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा-जावली मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा करून सातत्याने कोट्यवधींच्या निधीची बरसात करणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन सातारा व जावली तालुक्यातील ३२ विकासकामे मार्गी लावण्यासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा, गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून हा निधी मंजूर केला आहे.
सविस्तर वृत्तराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या काही निर्णयांमुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. कारण त्यांनी केवळ दहाच मिनिटांमध्ये कॅबिनेटची बैठक सोडली. अजित पवारांच्या नाराजीचा परिणाम महायुतीच्या नात्यामध्ये होईल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीजवळील निसर्गरम्य कासवंडच्या (Kaswand Plateau) पश्चिमेस असणारे सुमारे ७० एकरचं विस्तीर्ण पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले आहे. सध्या पठारावर सप्तरंगी फुलांची उधळण झाली आहे. कास पठारावर फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची पावले आता कासवंडच्या पठाराकडे वळू लागली आहेत.
सविस्तर वृत्तशालेय वाहतुकीच्या नियमानुसार स्कूल बसमध्ये 12 पेक्षा अधिक विद्यार्थी बसवण्याची क्षमता असते. त्यामुळे स्कूल बसमध्ये महिला सहायक असणे आवश्यकच असते. मात्र, स्कूल व्हॅनची क्षमता ‘सेव्हन प्लस वन’ इतकी आहे. त्यामुळे आरटीओ अधिकार्यांनी स्कूल व्हॅनमध्ये महिला सहायक असाव्यात, यासाठी जबरदस्ती करू नये, अशी मागणी पुण्यातील शालेय वाहतूक संघटनांनी केली.
सविस्तर वृत्तराज्यातील दुसरे सौरग्राम म्हणून खेड तालुक्यातील टेकवडी (जि. पुणे) गावाने मान पटकावला आहे. १२३९ लोकसंख्येच्या या गावातील सर्वच घरगुतीसह ७४ वीजजोडण्यांना सौर ऊर्जा प्रकल्पांतून वीजपुरवठा सुरु झाला आहे. महावितरणकडून राज्यातील १०० गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून त्यात टेकवडी गावाची निवड झाली होती. यामध्ये मान्याची वाडी (ता. पाटण जि. सातारा) नंतर राज्यातील दुसरे सौरग्राम म्हणून टेकवडी गावाने एकजुटीने ‘सौर’ उड्डाण यशस्वी केले आहे.
सविस्तर वृत्तगुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेसाठी महायुती सरकारने 2022-23 च्या दरसूचीनुसार 5409.72 कोटी रुपयांच्या निवेदला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. नियामक मंडळाने या उपसा सिंचन योजनेचे कार्यक्षेत्र वाढवल्याने सातारा, कोरेगाव, माण, खटाव या चार तालुक्यातील 176 गावांचे 6004.37 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. ही योजना येत्या दीड वर्षात पूर्ण करावयाची आहे.
सविस्तर वृत्तमेगास्टार अमिताभ बच्चन यांचा रियालिटी शो कौन बनेगा करोडपती सीझन 16 सध्या चर्चेत आहे. शोचे पुढचे पाहुणे दुसरे कोणी नसून बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान असणार आहेत. हे दोघेही बिग बींच्या वाढदिवसानिमित्त KBC च्या मंचावर काहीतरी खास करणार आहेत. आणि अमिताभ बच्चन यांना खास भेट देणार आहेत.
सविस्तर वृत्तवीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासह दरमहाच्या चालू वीजबिलाची व मागील थकबाकी वसुली करावी. त्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा बनवून आणि त्यात सातत्य राखून वीजबिल वसुली करावी तसेच ग्राहक सेवेत सुधारणा करण्याचे निर्देश महावितरण पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी दिले.
सविस्तर वृत्त