ऐतिहासिक मोती तलावाचा परिसर पानवेलींनी झाकला गेला असून त्यामुळे येथे अस्वच्छता वाढली आहे. लोकप्रतिनिधी खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोरील या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य असून या वेलींचे निर्मूलन करणे गरजेचे असताना वृक्ष विभागाचे आळमटळम सुरू आहे. प्रशासनाने नेमलेल्या ठेकेदाराचे या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष असून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन खा. नितीन पाटील यांची महाराष्ट्रात राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्यानंतर, त्यांचा आज दिल्ली येथील संसद भवनात शपथविधी झाला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी नितीन पाटील यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली.
सविस्तर वृत्तजागतिक वारसास्थळ असणार्या कास फुलोत्सवाची पर्वणी आता पर्यटकांसाठी खुली झाली असून पर्यटकांना वेगवेगळ्या टप्प्यात विविध नैसर्गिक रंगीबेरंगी फुले पाहता येणार आहेत. कास पठारावरील फुलांच्या हंगामाचे उद्घाटन गुरुवारी सातार्याच्या उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांच्या हस्ते झाले.
सविस्तर वृत्तराजपथावरून वारंवार निघणार्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकांमुळे राजपथावरील व्यापार्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबतचे निवेदन त्यांनी पोलीस यंत्रणेला सादर केले होते. या प्रकरणाचा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी निषेध केला.
सविस्तर वृत्तखाजगी सावकारीतून होणार्या मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल सांगलीकर बंगला, महाबळेश्वर येथील अनिकेत विठ्ठल ढेबे या युवकाने या प्रकरणात न्याय न मिळाल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या प्रकारास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी प्रसार माध्यमांना पत्रकार परिषदेत सांगितले.
सविस्तर वृत्तसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील सर्वाधिक धरणं असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचं समजलं जाणाऱ्या भंडारदरा धरणाचं सरकारनं नाव बदललं आहे. अकोले तालुम्यात असणारं हे फेमस ब्रिटिशकालीन धरण समजले जाणारे भंडारदरा धरणाचे आद्य क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं नामकरण करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तविघ्नहर्ता गणरायाच्या पाठोपाठ दाखल होणाऱ्या महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीच्या स्वागताची घराघरात लगबग सुरू झाली आहे. गणपतीच्या सजावट साहित्य बरोबरच गौरींना सजवण्यासाठी लागणाऱ्या असंख्य प्रकारचे दागिने कंबरपट्टे, मंगळसूत्र, बोरमाळ, चपलाहार यासारखे असंख्य प्रकारचे दागिने तसेच विविध प्रकारचे मुखवटे आणि साड्यांनी बाजारपेठ साजल्या आहेत.
सविस्तर वृत्तएसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही सुरुच होता. त्यामुळे प्रवाशांचे, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हात झाले. दरम्यान, खासगी वडाप मात्र सुसाट होते. ज्या ठिकाणी संघटनेच्या नेत्यांचे वर्चस्व आहे, त्या आगारातील एसटीच्या फेऱ्या बंद ठेवून प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामध्ये कराड पूर्णत: बंद असून वडूज आगारात फक्त एकच फेरी सुरु आहे.
सविस्तर वृत्तयेत्या गणेशोत्सवामध्ये टिळक मेमोरियल चर्चच्या वहिवाटीच्या जागेवर वाहनांसाठी पार्किंग सोय करण्याचे सातारा पालिकेचे नियोजन आहे. या धोरणावर मेमोरियल चर्चा पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे आक्षेप घेतला आहे याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना देण्यात आले या निवेदनावर 23 पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
सविस्तर वृत्त