एकाच आधार कार्डवर लाडकी बहीणचे ३० अर्ज खारघरचे आधारकार्ड नंबर भरले. साताऱ्यात या मथळ्याखाली दैनिक लोकमत, सातारा दि.०३/०९/२०२४ रोजी बातमी प्रसिध्द झालेली आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने तपासणी केली असता "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" ladakibahin.maharashtra.gov.in या नवीन पोर्टलवर प्रतीक्षा पोपट जाधव मु.पो.मायणी ता. खटाव जि. सातारा या २२ वर्ष वयोगटातील मुलीच्या नावाचे वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करुन अर्ज भरण्यात आलेले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याचे मुरब्बी व कसलेले राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे फलटणचे राजे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्य करून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
सविस्तर वृत्तबुलंद या शब्दाचा अर्थ अतिप्रचंड. पण पत्रकारितेच्या क्षेत्रात बुलंद या शब्दाचा गुणात्मक अर्थ घ्यायचा झाला तर सत्यावर अटळ राहणारा, सत्याची कास धरणारा... अठराव्या शतकात अटकेपर्यंत विस्तारलेल्या मराठा राज्याची राजधानी सातारा किल्ला उर्फ़ अजिंक्यतारा किल्ला होता.
सविस्तर वृत्तयेत्या 7 सप्टेंबर रोजी गणरायाचे सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. दि. 7 ते 17 सप्टेंबर या दहा दिवसांमध्ये संपूर्ण गणेशोत्सव काळात प्लाजमा लेझर लाईट यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे व ध्वनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी यांच्यावर कठोर कारवाई करून त्या जागेवर जप्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील एसटी सेवेला परिवहन कर्मचाऱ्यांच्या कामगार संपाचा चांगलाच फटका बसला. प्रशासनाने एसटी सेवा अंशतः सेवा बाधित झाल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात सातारा जिल्ह्यातील 354 वाहनांच्या फेऱ्यांपैकी 138 फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. लांब पल्यांच्या सेवा वगळता जिल्हा अंतर्गत व शहरी बसची चाके थांबल्याने प्रवासी सेवा ठप्प झाली.
सविस्तर वृत्तपुणे शहरातील गणेशोत्सव देशभर प्रसिद्ध आहे. पुण्यातील गणपती उत्सव पाहण्यासाठी देशातून अन् विदेशातून भाविक येतात. पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मोठे आकर्षण असते. अनेक वेळा विसर्जन मिरवणूक लांबते. यामुळे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने विसर्जन मिरवणूक वेळेत होण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरानजिकच्या खेड ग्रामपंचायतीमध्ये विकासकामे मंजूर असूनही कामे पूर्ण करण्यासाठी साहिल अकबर शेख हा युवक अडथळा निर्माण करत आहे. यामुळे खेडचे सरपंच लता फरांदे, उपसरपंच, सदस्य यांनी झेडपी कार्यालयासमोर शुक्रवारी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
सविस्तर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात असणार आहे. त्या अनुषंगाने नुकतेच अजित पवार हे नागपूर विमानतळावर दाखल झाले असून त्यानंतर त्यांनी प्रथम नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाऊन अभिवादन केलं.
सविस्तर वृत्तमुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढणार आहे. मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. मुंबईसाठी सुरु असणाऱ्या 12 रेल्वे प्रकल्पांची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरुन दिली आहे.
सविस्तर वृत्तनौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. यामागचं कारण अजून कळू शकलेलं नाही. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं.
सविस्तर वृत्त