कोरेगावचे विद्यमान आमदार यांच्या राजकीय दबावापुढे लोटांगण घालून तेथील पोलीस त्यांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे काम करत आहेत. माझ्या कार्यकर्त्यांना अमिषे दाखवली जात आहेत, वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत, विरोधकांची कुंडली काढून खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत, असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे आमदार राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
सविस्तर वृत्तपद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांनी ब्रिटिशांच्या विरुध्द केलेल्या अनेक आंदोलनापैकी एक रोमहर्षक प्रसंग रविवार, दि. 10 सप्टेंबर 1944 रोजी सातारा येथे घडला. या घटनेस 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णांच्या सातारा जेलच्या तटावरुन क्रांतिकारक उडीचा शौर्य दिन आज हुत्मामा सहकारी साखर कारखाना वाळवाचे (जि. सांगली) चेअरमन वैभवकाका नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तजरंडेश्वर नाका परिसरातील माता भिमाई आंबेडकर स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मंगळवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये सामाजिक न्याय भवनांच्या विभागामार्फत निधी आणण्यात येऊन स्मारकासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल व त्याचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
सविस्तर वृत्तखाजगी सावकारकीच्या व्याज वसुलीतून एकाला वेळोवेळी दमदाटी व शिवीगाळ करून तसेच त्यांच्या आई-वडिलांकडून कोरे स्टॅम्प पेपर लिहून घेतल्याप्रकरणी महाबळेश्वर मध्ये तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तस्वराज्याच्या कुलमुखत्यार व छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे शृंगारपूर येथे भव्य स्फूर्ती स्थळ व्हावे, या मागणीसाठी सातार्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेश शिर्के हे आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी 9 सप्टेंबर रोजी पासून त्यांनी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण सुरू केले आहे. शृंगारपूरचे सरपंच विनोद पवार या आंदोलनात सहभागी झाले आहे.
सविस्तर वृत्तभारत मातेचे सुपूत्र पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांनी ब्रिटीशांच्या विरुध्द केलेल्या अनेक आंदोलनापैकी एक रोमहर्षक प्रसंग रविवार दिनांक 10 सप्टेंबर 1944 रोजी सातारा येथे घडला. या घटनेस 80 वर्षे पुर्ण होत आहेत.
सविस्तर वृत्तपुण्यातही गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते आहे. दरवर्षी गणेशोत्सवात गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून तसेच जिल्ह्यातून लाखो भक्त गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी येतात. गणेशभक्तांसाठी पुणे मेट्रोने खास सोय केली आहे
सविस्तर वृत्तभाऊसाहेब हनुमंतराव कादबाने यांचे दि. 8 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 71 वर्षांचे होते.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर येथील हॉटेल व्यज्ञवसायिकाची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो, असे सांगून एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे नेमणुकीस असलेल्या अपर पोलीस अधीक्षकांस अटक करण्यात आली आहे. त्यांस न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
सविस्तर वृत्तगणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या अशा जयघोषात, साश्रुनयनांनी सातारा शहरातील गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. रविवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे वाजत, गाजत उत्साहात, भावपूर्ण वातावरण विसर्जन करण्यात आले. एकूण ५ हजार गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
सविस्तर वृत्त