आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना एकेरी भाषा वापरल्याच्या प्रकरणाचा साताऱ्यात निषेध करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस बहुउद्देशीय संस्था सातारा यांचे वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
सविस्तर वृत्तठोसेघर धबधबा हे कास प्रमाणेच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिला आहे. त्यातून आता पाऊस कमी झाल्याने पर्यटकांचा ओघ ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी रोजच वाढताना दिसत आहे. वर्षा सहलीसाठी राज्यासह देश-विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी ठोसेघरला पसंती देत आहेत.
सविस्तर वृत्तसातारा तहसील कार्यालयाने आवारामध्ये दिवसेंदिवस पडून राहिलेल्या 18 वाहनांचा मंगळवारी लिलाव केला. या लिलावातून तहसीलदार कार्यालयाला 18 लाख 93000 चा महसूल प्राप्त झाला येथील परिसर वाहन मुक्त झाला असून यापुढे अशा वाहनांची गर्दी होऊ दिली जाणार नाही, अशी माहिती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात श्री गणरायाच्या आगमनाला केवळ 48 तास उरले आहेत. असे असताना सातारा जिल्हा पोलीस बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया रूट मार्च कोंबिंग ऑपरेशन याची तयारी सुरू केली आहे.
सविस्तर वृत्तगेल्या दोन महिन्यांत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 1.70 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसानं झालं. आहे. मराठवाडा आणि विदर्भाला या नुकसानीचा सर्वाधिक फटका बसलाय. तर सप्टेबर महिन्याच्या सुरूवातीपासून अतिवृष्टी होत असून त्यामुळे मराठवाड्यात जे नुकसान झालंय त्याची माहिती कृषी विभागाकडून घेण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील ट्रान्सवुमन वीणा काशीद यांची व्यवसाय तंत्रशिक्षण विभाग, पुणे येथे विद्युत निर्देशक पदी निवड झाली आहे. या पदावर निवड होणाऱ्या त्या जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील पहिल्या ट्रान्स वुमन ठरल्या आहेत.
सविस्तर वृत्तसातारा : जिल्ह्यात कोणताही अनुचीत प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 2014 चे कलम 37 (1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधि
सविस्तर वृत्तएकाच आधार कार्डवर लाडकी बहीणचे ३० अर्ज खारघरचे आधारकार्ड नंबर भरले. साताऱ्यात या मथळ्याखाली दैनिक लोकमत, सातारा दि.०३/०९/२०२४ रोजी बातमी प्रसिध्द झालेली आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने तपासणी केली असता "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" ladakibahin.maharashtra.gov.in या नवीन पोर्टलवर प्रतीक्षा पोपट जाधव मु.पो.मायणी ता. खटाव जि. सातारा या २२ वर्ष वयोगटातील मुलीच्या नावाचे वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करुन अर्ज भरण्यात आलेले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याचे मुरब्बी व कसलेले राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे फलटणचे राजे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्य करून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
सविस्तर वृत्तबुलंद या शब्दाचा अर्थ अतिप्रचंड. पण पत्रकारितेच्या क्षेत्रात बुलंद या शब्दाचा गुणात्मक अर्थ घ्यायचा झाला तर सत्यावर अटळ राहणारा, सत्याची कास धरणारा... अठराव्या शतकात अटकेपर्यंत विस्तारलेल्या मराठा राज्याची राजधानी सातारा किल्ला उर्फ़ अजिंक्यतारा किल्ला होता.
सविस्तर वृत्त