येत्या 7 सप्टेंबर रोजी गणरायाचे सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. दि. 7 ते 17 सप्टेंबर या दहा दिवसांमध्ये संपूर्ण गणेशोत्सव काळात प्लाजमा लेझर लाईट यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे व ध्वनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी यांच्यावर कठोर कारवाई करून त्या जागेवर जप्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील एसटी सेवेला परिवहन कर्मचाऱ्यांच्या कामगार संपाचा चांगलाच फटका बसला. प्रशासनाने एसटी सेवा अंशतः सेवा बाधित झाल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात सातारा जिल्ह्यातील 354 वाहनांच्या फेऱ्यांपैकी 138 फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. लांब पल्यांच्या सेवा वगळता जिल्हा अंतर्गत व शहरी बसची चाके थांबल्याने प्रवासी सेवा ठप्प झाली.
सविस्तर वृत्तपुणे शहरातील गणेशोत्सव देशभर प्रसिद्ध आहे. पुण्यातील गणपती उत्सव पाहण्यासाठी देशातून अन् विदेशातून भाविक येतात. पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मोठे आकर्षण असते. अनेक वेळा विसर्जन मिरवणूक लांबते. यामुळे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने विसर्जन मिरवणूक वेळेत होण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरानजिकच्या खेड ग्रामपंचायतीमध्ये विकासकामे मंजूर असूनही कामे पूर्ण करण्यासाठी साहिल अकबर शेख हा युवक अडथळा निर्माण करत आहे. यामुळे खेडचे सरपंच लता फरांदे, उपसरपंच, सदस्य यांनी झेडपी कार्यालयासमोर शुक्रवारी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
सविस्तर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात असणार आहे. त्या अनुषंगाने नुकतेच अजित पवार हे नागपूर विमानतळावर दाखल झाले असून त्यानंतर त्यांनी प्रथम नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाऊन अभिवादन केलं.
सविस्तर वृत्तमुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढणार आहे. मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. मुंबईसाठी सुरु असणाऱ्या 12 रेल्वे प्रकल्पांची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरुन दिली आहे.
सविस्तर वृत्तनौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. यामागचं कारण अजून कळू शकलेलं नाही. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं.
सविस्तर वृत्तमुंबई-गोवा ४७१ कि.मी राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरु आहे. परंतु हे काम पूर्ण होत नाही. त्यानंतर समृद्धी महामार्ग तयार झाला. पण हा महामार्ग अजूनही पूर्ण झाला नाही. या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्तसंततधार जोरदार पावसामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी सातारा जिल्ह्यात संपन्न झाला.
सविस्तर वृत्तमुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे स्थानकात एका एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
सविस्तर वृत्त