पुरुषोत्तम जाधव यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन तालुक्यांच्या नात्यांची बेरीज केली आहे. त्यांचे सुपुत्र शुभंकर व महाबळेश्वरच्या कोंढाळकर घराण्यातील सायली लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. कै. ह. भ .प. बाजीराव आनंदराव जाधव यांचे नातू व पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांचे चिरंजीव चि.शुभकंर पुरूषोत्तम जाधव रा. अतिट ता .खंडाळा जि.सातारा आणि महाबळेश्वरचे माजी उपनगराध्यक्ष हे मूळचे वाई तालुक्यातील पश्चिम भागातील बोरगाव येथील आहेत लक्ष्मण कोंढाळकर यांची नात व बाळकृष्ण कोंढाळकर यांची कन्या सायली यांचा महाबळेश्वर येथे आज कुंकुम तिलक सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यामुळे खंडाळा तालुका आणि वाई महाबळेश्वर तालुक्याचे नाते दृढ झाले आहे.
खंडाळा : पुरुषोत्तम जाधव यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन तालुक्यांच्या नात्यांची बेरीज केली आहे. त्यांचे सुपुत्र शुभंकर व महाबळेश्वरच्या कोंढाळकर घराण्यातील सायली लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. कै. ह. भ .प. बाजीराव आनंदराव जाधव यांचे नातू व पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांचे चिरंजीव चि.शुभकंर पुरूषोत्तम जाधव रा. अतिट ता .खंडाळा जि.सातारा आणि महाबळेश्वरचे माजी उपनगराध्यक्ष हे मूळचे वाई तालुक्यातील पश्चिम भागातील बोरगाव येथील आहेत लक्ष्मण कोंढाळकर यांची नात व बाळकृष्ण कोंढाळकर यांची कन्या सायली यांचा महाबळेश्वर येथे आज कुंकुम तिलक सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यामुळे खंडाळा तालुका आणि वाई महाबळेश्वर तालुक्याचे नाते दृढ झाले आहे.
पुरुषोत्तम जाधव हे राजकारण, समाजकारण व क्रीडा क्षेत्रात मोठे काम करीत असून महाबळेश्वर येथील कोंढाळकर कुटुंबीय देखील राजकारण समाजकारणात कार्यरत आहे आता या नव्या स्नेहबंधामुळे खंडाळा व महाबळेश्वर वाई चे आप्तेष्टांचे नाते जुळले आहे. चि.शुभंकर व चि. सौ. का. सायली यांचा भव्य शाही विवाह सोहळा लवकरच होणार आहे.