सातार्यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सातार्यात आयोजित विशेष विचारसंवाद कार्यक्रमात संघाच्या कार्यपद्धतीपासून ते समाजपरिवर्तनाच्या संकल्पनांपर्यंत विविध विषयांवर चर्चा झाली.
सातारा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सातार्यात आयोजित विशेष विचारसंवाद कार्यक्रमात संघाच्या कार्यपद्धतीपासून ते समाजपरिवर्तनाच्या संकल्पनांपर्यंत विविध विषयांवर चर्चा झाली.
या कार्यक्रमात क्षेत्रीय प्रचार विभाग प्रमुख प्रमोद बापट आणि कोल्हापूर विभाग प्रचार प्रमुख विवेक मंद्रूपकर यांनी मार्गदर्शन केले.
प्रमोद बापट यांनी संघाच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट करताना देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा आढावा घेतला. इतिहासातील आव्हानात्मक काळात समाजात निर्माण झालेली दुरावस्था आणि मानसिकतेतील बदल लक्षात घेऊन संघाची उभारणी करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. संघाच्या शाखा प्रणालीमुळे व्यक्तीमध्ये संघटितपणा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.
संघाच्या कार्याचा विस्तार केवळ देशापुरता मर्यादित नसून विविध क्षेत्रांमध्ये त्याचे कार्यकर्ते सक्रिय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात उपस्थितांनी विविध प्रश्न उपस्थित करत संवादात्मक वातावरण निर्माण केले.
विवेक मंद्रूपकर यांनी दुसर्या सत्रात पंच परिवर्तन’ या संकल्पनेवर सविस्तर मार्गदर्शन केले. कुटुंबव्यवस्थेची मजबुती, आत्मचिंतन, समाजातील ऐक्य, पर्यावरणाची जपणूक आणि नागरी जबाबदार्या या पाच घटकांद्वारे सकारात्मक बदल घडवता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप आठल्ये यांनी केले. सूत्रसंचालन ऍड. अविनाश सुतार यांनी पार पाडले. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता पारंपरिक पद्धतीने करण्यात आली.