गळफास घेऊन एकाची आत्महत्या
गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी क्षेत्र माहुली, ता. सातारा गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या काठावर अमोल कचरू कांबळे रा. प्रतापसिंह नगर, खेड, ता. सातारा याने लिंबाच्या झाडास नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याला उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आणले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. पुढील तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.