इराणी कप स्पर्धेतील सामन्यात चौथ्या दिवशी मुंबईच्या पृथ्वी शॉ याने रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध अर्धशतक केलं आहे. अनेक वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या या युवा खेळाडूला या सामन्यातील पहिल्या डावात काही खास करता आलं नाही. पृथ्वी 7 चेंडूत 4 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे पृथ्वीवर टीका करण्यात आली. मात्र पृथ्वीने दुसऱ्या डावात दमदार कमबॅक केलं.
सविस्तर वृत्तमाची पेठ परिसरातील चिकन दुकानांमध्ये भीषण स्फोट होऊन मुजमिल हमीद पालकर या इसमाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाचा सातारा शहर पोलीस कसून तपास करत असून गुरुवारी या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तवंचित बहुजन आघाडी हा पक्ष बरखास्त करून घटना तज्ञ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ऐक्यासाठी अध्यक्ष पद स्वीकारावे. या कृतीमुळे या पक्षाची महाराष्ट्रात ताकद वाढणार आहे. तुमच्यासाठी मी स्वतः अध्यक्षपद सोडायला तयार आहे, अशी थेट ऑफर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तभक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी अर्थात दसरा दरम्यान साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला जय अंबे, जगदंबे ..च्या जयघोषात मोठ्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. सालाबादप्रमाणे सातारा जिल्ह्यातील अनेक देवी मंदिरांमध्ये हा भक्ती आणि शक्तीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यासाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संघटनेच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका येथील निवासस्थानासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तरी दिव्यांग बांधवांनी तेथेच बसकन मारली.
सविस्तर वृत्तसहकार क्षेत्रात काम करणार्या बँकांनी वित्तीय क्षेत्रात जर काटेकोरपणा पाळला तर त्याचा फायदा सहकारामध्ये काम करणार्या बँका, विकास सेवा सोसायटी यांना होऊन त्याची फळे प्रत्यक्षपणे शेतकर्यांना मिळतात. सातारा जिल्हा बँकेने शेतकर्याचे जीवनमान उंचावले आहे. गेली 17 वर्षे बँकेचा एनपीए शून्य आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकांनी कोणतेही आर्थिक निर्णय घेताना काटेकोरपणे आर्थिक नियमांचे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बँकेच्या संचालक मंडळाला उद्देशून केले.
सविस्तर वृत्तमाची परिसरातील शनिवार पेठ येथील चिकनचे दुकान व सर्व्हिसिंग सेंटर येथे भीषण स्फोट होऊन एक ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाचे कारण मात्र अस्पष्ट आहे. मुजमील हमीद पालकर वय 40 रा. गुरुवार परज असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. हरून बागवान व उमर बागवान हे दोघे या स्फोटामध्ये जखमी झाले असून त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तदहिवडी तालुका माण गावाच्या हद्दीतील गोंदवले रस्त्यावर जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दहिवडी येथील तिघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. किशोर सत्यवान लोखंडे आणि त्यांचे चुलत भाऊ किरण लोखंडे हे मारहाणीत जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्तमी बारामतीला मुजरा करत नाही, म्हणूनच विरोधक एक होऊन माझा द्वेष करतात. माझी लढाई मतदारसंघात विविध योजनांचे पाणी आणून दुष्काळमुक्तीची आहे. माझ्या कामात अडथळे आणून पाणी देण्याला विरोध करणार्यांविरोधात मी कायमच लढलो आहे. माझा मतदारसंघ दुष्काळमुक्त होईपर्यंत ही लढाई सुरूच राहील, असे प्रतिपादन आ. जयकुमार यांनी केले.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी मनोज अमृतराव देशमुख यांची निवड झाली.
सविस्तर वृत्त