लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाजक घटक असून, काही संघटना काही लोक लिंगायत हा वेगळा धर्म असल्याचे सांगत आहेत, याबाबत लोकांच्या जनजागृती व्हावी यासाठी हिंदू वीरशैव लिंगायत समाजातर्फे वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यातील निंभोरे येथील ग्रामपंचायत वहिवाटीचा रस्ता अडवण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर कांबळे कुटुंबियांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला कुटुंबियांनी निवेदन दिले.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मागील अनेक वर्षापासून जुनी पेन्शन मागणीसाठी लढा देत आहे. संघटनेच्या विविध आंदोलनात लाखो कर्मचारी उपस्थितीत राहून जुन्या पेन्शनसाठी आपला असंतोष व्यक्त करीत असताना सरकार कोणतेही असले तरी वेळोवेळी मात्र शासनाने फक्त आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांच्या माथी फसव्या एनपीएस, जीपीएस, युपीएस या योजना मारण्याचा प्रयत्न केला आहे.
सविस्तर वृत्तराज्य शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून प्राप्त झालेल्या सहा इलेक्ट्रिक घंटागाडीचे वितरण जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. जिल्ह्यातील कुडाळ, लिंब, अतित, खेडसह सहा ग्रामपंचायतींना या गाड्या मिळाल्या आहेत. या इ-घंटागाड्यांमुळे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेस गती येणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातून एक 18 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तआजारपणाला कंटाळून वृद्धेने आत्महत्या केल्याची नोंद शाहुपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यातील कोळकी येथील हॉटेल कामगाराचा खून केल्याप्रकरणी दोनजणांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी.
सविस्तर वृत्तसातारा शहरामध्ये 16 व 17 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जन होणार असून त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तप्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणुक पाहण्यास आलेले लहान मुले, वयोवृध्द, जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिक यांच्या डोळ्यास इजा होवून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सव कालावधीत गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान प्लाझामा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापर करण्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिबंध आदेश जारी केले आहेत.
सविस्तर वृत्तपाच दिवसांचे गणपती आणि गौराई यांना निरोप दिल्यानंतर सातार्यात देखावे पाहण्यासाठी सातारकर घराबाहेर पडू लागले आहेत. रिमझिमत्या पावसामध्ये जिवंत देखावे आणि गणरायाचे भव्य मोहक स्वरूप डोळ्यात साठवण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे.
सविस्तर वृत्त