आर्थिक लाभाच्या अमिषाने सुमारे चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : आर्थिक लाभाच्या अमिषाने सुमारे चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनोळखी मोबाईलवर लिंक पाठवून द्वारे टास्क देवून पैसे मिळतील असे सांगून तब्बल 4 लाख 12 हजार 100 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अमित संपत फाळके (वय 39, रा.शाहूनगर, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 20 ऑक्टोबर रोजी घडली आहे.