हामदाबाज येथे अज्ञात चोरट्याने 25 हजारांची घरफोडी केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : हामदाबाज येथे अज्ञात चोरट्याने 25 हजारांची घरफोडी केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हामदाबाज ता.सातारा येथे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातून 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. 7 सप्टेबर 10 सप्टेबर या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी कलवंता पांडूरंग चव्हाण (वय 85, रा.हामदाबाज) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.