गुरुवार पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : गुरुवार पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी राजेंद्र विलासराव देशमुख रा. गुरुवार पेठ सातारा यांची घरासमोर पार्क केलेली दुचाकी क्र. एमएच 11 बीक्यू 9528 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.