सातारा शहर परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सातारा : सातारा शहर परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 23 रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणारी 21 वर्षीय युवती मोती चौक परिसरातून बेपत्ता झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बोडरे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 23 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विजय आनंद नडे रा. संगमनगर सातारा हे राहत्या घरातून वैद्यकीय रजेचा अर्ज देऊन येतो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.