राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संभाजीनगर, सातारा येथून सौ. रेश्मा दिशांत पारंगकर (वय 24, सध्या रा.संभाजीनगर, सातारा) या बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी पतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 19 नोव्हेबर रोजी घडली आहे.