आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला चुकीच्या दस्ताची दुरुस्ती करून त्याची सातबारा नोंद करणे कामी चार हजार रुपयांची लाच घेताना कुडाळ, ता. जावली येथील तलाठी शरद लिंबराज साळुंखे वय 54 रा. कोहिनूर रेसिडेन्सी, मधली आळी, वाई याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
सातारा : आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला चुकीच्या दस्ताची दुरुस्ती करून त्याची सातबारा नोंद करणे कामी चार हजार रुपयांची लाच घेताना कुडाळ, ता. जावली येथील तलाठी शरद लिंबराज साळुंखे वय 54 रा. कोहिनूर रेसिडेन्सी, मधली आळी, वाई याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवारी दिनांक 8 डिसेंबर रोजी करण्यात आली.
याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार यांनी दहा गुंठे जमिनीचा दस्त केला होता. सातबारावर नोंद होणे कामी त्यांनी अर्ज दिला होता. मात्र तो दस्त चुकीचा असून दस्तामध्ये दुरुस्ती करून त्याची सातबारा नोंद करणे कामी तलाठी साळुंखे यांनी तक्रारदारांना पाच हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती या कामासाठी चार हजार रुपये देण्याचे ठरले.
तलाठी सजा परिसरात साळुंखे याला ही लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार नितीन भोगावले, पोलीस हवालदार निलेश राजपुरे, विक्रमसिंह कणसे, अमोल खानविलकर यांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. साळुंखे यांच्यावर वाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.