बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निगडी तर्फ सातारा येथे बेकायदा दारु विक्री प्रकरणी शंकर बाबा मसुगडे (वय 60, रा. निगडी तर्फ सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 910 रुपये किंमतीच्या 13 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.