संशयित मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा
संशयित मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी एकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : संशयित मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी एकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विशाल चंद्रकांत काटकर (वय 40, रा. त्रिपुटी ता.कोरेगाव) याने त्याच्या ताब्यात असलेल्या दुचाकीच्या मालकीबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. पोलिसांना संबंधित दुचाकी चोरीची असल्याचा संशय आहे. तरीही माहिती दिली नसल्याने त्यावरुन पोलिसांनी त्याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.