प्रवाशांना लुटणाऱ्या दोन जणांना बारा तासांच्या आत जेरबंद करण्यात सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला यश आले आहे.
सातारा : प्रवाशांना लुटणाऱ्या दोन जणांना बारा तासांच्या आत जेरबंद करण्यात सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला यश आले आहे.
शाहिद शफिक शेख रा. रुपीनगर, निगडी, पुणे आणि विनायक गोवर्धन घाडगे रा. नागरदेवळे, अहमदनगर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुका पोलीस ठाण्यात दि. 11 रोजी सुनील कुमार विश्वनाथ गर्जे राहणार कल्याण पूर्व यांनी वरील तालुका सातारा गावच्या हद्दीतील विठ्ठल मंगलम हॉटेल समोरील रस्त्यावर दोन जणांनी रोख रक्कम व मोबाईल फोन चोरून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल केला होता.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांना संबंधित आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निलेश तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. बी. नेवसे, एस. एस. काटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे व सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने या आरोपींची गोपनीय माहिती मिळवून दोन संशयितांना किणी वाठार, कोल्हापुर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तक्रारदारांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरून नेल्याची कबुली दिली. दरम्यान संबंधितांकडून रोख रक्कम व मोबाईल फोन ताब्यात घेऊन दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. बी. नेवसे करीत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय अधिकारी राजीव नवले सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. बी. नेवसे, अनिल मोरडे, एस. एस. काटकर, पोलीस हवालदार राजू शिखरे, मालोजी चव्हाण, दादा स्वामी, पोलीस नाईक प्रदीप मोहिते, सतीश बाबर, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी डफळे, संदीप पांडव, धीरज पारडे, सचिन झनकर, रोहित बाबर, चालक सहाय्यक फौजदार माने यांनी सहभाग घेतला.