गळफास घेऊन एकाची आत्महत्या
गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या पूर्वी सुरज शशिकांत साबळे रा. शिवथर, ता. सातारा याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.