राहत्या घरातून महिला बेपत्ता
राहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शितल श्रीरंग देसाई (वय 50, रा. चंदननगर, सातारा) ही महिला बेपत्ता झाली आहे. ही घटना दि. 22 नोव्हेबर रोजी घडली असून याप्रकरणी त्यांच्या मुलाने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.