बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने एमएच ११ डीके ८२६२ या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. १२ सप्टेबर रोजी घडली आहे.
सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने एमएच ११ डीके ८२६२ या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. १२ सप्टेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी सिध्देश गोरख फडतरे (वय १९, रा. सातारा) या युवकाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.