स्वस्थ राष्ट्र उभारणीच्या ध्येयाने काम करणाऱ्या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांनी मंगळाई टेकडीवरील झाडांना पाणी घालून श्रमदान केले. इयत्ता पाचवी मधील सुमारे अडीचशे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यामध्ये भाग घेतला.
सविस्तर वृत्तलोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीमा वैभव खरात यांनी ऐन संक्रांतीच्या सणादिवशीच नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे दिला, तर उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांनीही आज आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा सीमा खरात यांच्याकडे दिल्याने लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले आहे.
सविस्तर वृत्तउत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळ्याचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशी पवित्र स्थानासाठी येथे कोट्यवधी भाविकांनी गर्दी केलेली असतानाच महाराष्ट्रातील एका नेत्याचं प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि सोलापूरचे माजी महापौर महेश कोठेंचं निधन झालं आहे.
सविस्तर वृत्तवाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट दि. 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तशासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास येते. या प्रकारामुळे ग्रामीण भागात रात्री-अपरात्री रुग्णालयात आलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होत असे.
सविस्तर वृत्तचचेगाव (ता. कऱ्हाड) अचानक लागलेल्या आगीत साडेतीन एकरातील ऊस जळून खाक झाला. जिल्हा परिषद शाळेलगत मळा नावाच्या शिवारात दुपारी ही घटना घडली.
सविस्तर वृत्तपाल (ता. कराड) येथे महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री खंडोबा व म्हाळसाकांत विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला.
सविस्तर वृत्तराज्याचे ग्रामविकासमंत्री ग्रामविकासाचे रोलमॉडेल असलेल्या आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये शनिवारी चांगलेच रमले. गावच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
सविस्तर वृत्तमराठा बिझनेस फोरम सातारा व आम्ही पुणेकर या दोन संस्थांच्या सहकार्याने देशातील बारा राज्यांमधून भव्य अश्वारूढ शिव पुतळ्याची मिरवणूक काढली जाणार असून त्या मिरवणुकीचा प्रारंभ दिनांक 15 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता राजवाडा गांधी मैदान (सातारा) येथून होणार आहे.
सविस्तर वृत्त