संपूर्ण राज्याला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती अखेर तो क्षण महाराष्ट्राने अनुभवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासमक्ष त्यांनी शपथ ग्रहण केली.
सविस्तर वृत्तकोस्टल रोडमुळं मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका झाली आहे. वेगवान प्रवासामुळं प्रवाशांचा वेळ वाचतोय. आता मरिन लाइन्स ते वांद्रेदरम्यानच्या कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासह त्यांच्या विविध समस्यांसाठी विधानसभेमध्ये निश्चित पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही, कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तगौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी मधील मुलांच्या वस्तीगृहात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणामुळे विद्यार्थीही सुखावले.
सविस्तर वृत्तकराड उत्तर विधानसभा मतदार संघात सर्व धुरीणांचे अंदाज फोल ठरवत आ. मनोजदादा घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांच्या गेल्या 25 वर्षीच्या सत्तेला धक्का देत मोठा विजय मिळवला. सातारा तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या असणार्या नागठाणे जिल्हा परिषद गटावर यावेळी सबकुछ मनोजदादा घोरपडे अशी हवा उमेदवारी जाहीर झाल्यापासून होती.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवप्रताप दिन हा तिथी ऐवजी तारखेवर साजरा करावा, अशी मागणी भारतीय रक्षक आघाडीचे सरचिटणीस अमर गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
सविस्तर वृत्तसातारा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त सहकार्याने खाजगी सावकाराकडून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 146 थोडी वजनाचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहरात बंद पडलेल्या टपऱ्या वाहतुकीच्या कोंडीचे कारण ठरत आहेत. त्यामुळे त्या हटवण्याचा धडाका पालिकेने लावला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सातारा पालिकेने सातारा मध्यवर्ती बस स्टँड परिसरातील तब्बल दहा टपऱ्या हटवल्या आहेत.
सविस्तर वृत्तविधिमंडळाच्या नेतेपदी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली असून येत्या गुरुवारी आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची ते शपथ घेणार आहेत.
सविस्तर वृत्तसातारा येथील शिवछत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला मंत्रीपद द्यावे, अन्यथा वीजवाहक टॉवरवरुन उडी मारुन आपले जीवन संपवेन, अशी धमकी देणार्या होमगार्ड मध्ये जवान असणार्या एका तरुणाने आपला व्हिडिओ व्हायरल करीत एकच खळबळ उडवून दिली होती.
सविस्तर वृत्त