डीआरआयने एअर कार्गो कॉम्प्लेक्समधील डीजे लाइटमध्ये लपवून ठेवलेले 9.6 कोटी रुपयांचे 12 किलो तस्करीचे सोने जप्त केले.
सविस्तर वृत्तकुस खुर्द, ता. सातारा गावच्या हद्दीत वन विभागाला आजारी अवस्थेत असलेला बिबट्या आढळून आला. याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या कर्मचार्यांनी या बिबट्याला ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्तसालाबाद प्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला श्री दत्तात्रेय जयंती उत्सव साजरा केला जातो. शनिवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर हा दत्तजन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिरातून ..अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा..च्या जयघोषात साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तपत्रकार हा समाजाचा आरसा असतो. चांगल्या व वाईट गोष्टींचे प्रतिबिंब पत्रकारितेतून दिसून येते. त्यामुळे लोकशाहीचा हा चौथा स्तंभ नेहमीच चर्चेत असतो. सातार्यातील युवा पत्रकार पलाश जवळकर यांनी बातमीपेक्षाही माणुसकी दाखवून एका व्यक्तीचे प्राण वाचविले. या अतुलनीय कामगिरीबद्दल सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांनीच युवा पत्रकार पलाश जवळकर यांचा सन्मान केला.
सविस्तर वृत्तहिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे चौथे छत्रपती, सातारा नगरीचे संस्थापक श्री.छ.शाहू महाराज (थोरले) यांच्या प्रती सातारकरांच्यावतीने रविवार दि. १५ डिसेंबर रोजी कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तराज्याच्या राजकरणातून एक मोठी बातमी सामोर येथ आहे. दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. त्यामुळे संमेलनाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील पोवई नाका परिसरात उभारण्यात येत असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी माजी मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी दुपारी केली. यावेळी पुढील दोन महिन्यात स्मारकाचे काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
सविस्तर वृत्तसातार्यातील 100 रुपयांच्या स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांनी आज एल्गार पुकारत स्टॅम्प व्हेंडरांच्या शेजारी उभे राहून खातरजमा केली असता ही टंचाई फक्त कृत्रिम असल्याचे निदर्शनास आले.
सविस्तर वृत्तकेंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल गावाचे सरपंच रविंद्र माने यांचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थाकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी अभिनंदन केले.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प अजूनही काठापर्यंत भरले असून, १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळे पुढील काळात विसर्गही वाढणार असल्याने धरणांतील साठाही कमी होणार आहे.
सविस्तर वृत्त